हिंदू महासभेने मीरतमध्ये केले नथुराम गोडसे मंदीराचे भूमीपूजन

By Admin | Updated: December 25, 2014 20:53 IST2014-12-25T17:30:39+5:302014-12-25T20:53:00+5:30

महात्मा गांधींचा खून करणा-या नथुराम गोडसेचे मंदीर बांधण्यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेने मीरतमध्ये भूमीपूजन केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

The Hindu Mahasabha did the mishap in the land of Nathuram Godse temple | हिंदू महासभेने मीरतमध्ये केले नथुराम गोडसे मंदीराचे भूमीपूजन

हिंदू महासभेने मीरतमध्ये केले नथुराम गोडसे मंदीराचे भूमीपूजन

>ऑनलाइन लोकमत
मीरत (उत्तर प्रदेश), दि. २५ - महात्मा गांधींचा खून करणा-या नथुराम गोडसेचे मंदीर बांधण्यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेने मीरतमध्ये भूमीपूजन केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या वृत्तानंतर स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मीरतमधल्या शारदा रोडवर प्रस्तावित मंदीर होणार असल्याचे व त्यादृष्टीने धार्मिक विधी केल्याचे वृत्त आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय सचिव आचार्य मदन यांनी यावेळी नथुराम हा खरा देशभक्त असल्याचे उद्गार काढल्याचे तसेच नरेंद्र मोदींवर टीका केल्याचेही वृत्त आहे. हिंदूमध्ये अन्य धर्मीयांना आणण्याबाबतही महासभेने तयारी चालवल्याबद्दलही या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले. जिल्हा दंडाधिकारी नवनीत सिंग यांनी पीटीआयशी बोलताना जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. 
पोलीस अधिका-यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. शहरामधली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती शांततापूर्ण राखण्यात येील आणि कोणालाही समाजनिघातक कारवायाकरू देता येणार नाहीत अशी स्पष्ट समज पोलीसांनी दिली आहे.

Web Title: The Hindu Mahasabha did the mishap in the land of Nathuram Godse temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.