हिंदू महासभेने जाळली दाऊद इब्राहिमची कार
By Admin | Updated: December 24, 2015 00:02 IST2015-12-24T00:02:33+5:302015-12-24T00:02:33+5:30
प्रारंभी या कारचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचा निर्णय मी घेतला होता. परंतु परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकी डी गँगकडून मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे ठरविले.

हिंदू महासभेने जाळली दाऊद इब्राहिमची कार
प्रारंभी या कारचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचा निर्णय मी घेतला होता. परंतु परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकी डी गँगकडून मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे ठरविले. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथे दहशतवादविरोधी घोषणा देत ही कार जाळण्यात आली.
दरम्यान हिंदू महासभेतर्फे दाऊदची कार जाहीरपणे जाळण्यात येत असल्याचे कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना परवानगी पत्रसुद्धा मागितले. परंतु कार्यकर्त्यांचा संताप बघून त्यांनी काढता पाय घेतल्याचे समजते.
चक्रपाणी यांनी दाऊद टोळीकडून मिळालेल्या धमकीसंदर्भात दिल्लीच्या मंदिर मार्गावरील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.(वृत्तसंस्था)
........