शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 21:48 IST

आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे

कोची - हिंदुच्या मंदिरात मुस्लिमांना प्रवेश मिळतो, पण मुस्लीम समुदायाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीत हिंदुना प्रवेश दिला जात नाही, असे अनेकदा आपण ऐकले असेल. मात्र, तुमचा हा समज खोटा ठरवणारी आणि जातीभेदीच्या भिंती तोडून टाकणारी घटना केरळमध्ये घडली आहे.  येथे अलपुझा जिल्ह्याच्या कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे प्राचीन महत्त्व असलेल्या मशिदीत हे लग्न लावून देण्यात आलं आहे.  

केरळमधील या धार्मिक आणि जातीय सलोख्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही कौतुक केलंय. केरळमधल्या एकतेचं हे प्रतिक असल्याचं पिनराई यांनी म्हटलंय. आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे. मुलगी आशाच्या आईने मुस्लीम धर्माच्या नागरिकांकडे या लग्नासाठी मदत मागितली होती. आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने बिंदू यांनी मुस्लीम बांधवांकडे मदत मागितीहोती. त्यानंतर, मशिद समितीने मुलीच्या लग्नासाठी मशिद उपलब्ध करुन दिली. 

विशेष म्हणजे, लग्नासाठी 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला होता. त्यानुसार, मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात आल्या. मशिद समितीने मुलीला 10 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे पूर्ण लग्न हिंदू पद्धतीने पार पडलं. या लग्नासाठी 1 हजार पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुलीची आई बिंदू यांनी मशिद समितीचे आभार मानले आहेत. सध्या, केरळमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. 

विवाह झालेल्या तरुणीचं नाव आशा आहे. आशाच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली. 

टॅग्स :marriageलग्नKeralaकेरळChief Ministerमुख्यमंत्रीHinduहिंदूMuslimमुस्लीम