शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदी भाषा देशाला एकजूट करू शकते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 04:41 IST

देशाला आज एकजूट करण्याचे काम जर एखादी भाषा करू शकत असेल तर ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी हीच आहे,

नवी दिल्ली : देशाला आज एकजूट करण्याचे काम जर एखादी भाषा करू शकत असेल तर ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी हीच आहे, असे ट्विट भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त केले. त्यावर दक्षिणेतील राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.अमित शहा यांनी टष्ट्वीट केले की, भारत विविध भाषांचा देश आहे आणि प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व आहे; पण पूर्ण देशाची एक भाषा असणे अत्यंत आवश्यक आहे. जी भाषा जगात भारताची ओळख होऊ शकेल. आज देशाला एकजूट करण्याचे काम हिंदी करू शकते. आज हिंदी दिनानिमित्त मी देशातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपापल्या मातृभाषेचा उपयोग वाढवा आणि हिंदी भाषेचा उपयोग वाढवून पूज्य बापू आणि लोहपुरुष सरदार पटेल यांचे स्वप्न साकार करण्यात योगदान द्या.हिंदी भाषेत साधेपणा, उत्स्फूर्तता आणि अभिजातता आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी टष्ट्वीट केले की, आज पूर्ण देशात हिंदी दिवस साजरा केला जात आहे. नरेंद्र मोदी कन्नड भाषा दिवस कधी साजरा करणार? ही सुद्धा राज्यघटनेनुसार हिंदीसारखीच अनुसूचित भाषा आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनीही या वादात उडी घेत म्हटले आहे की, हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा खोटारडेपणा बंद करा. कन्नडप्रमाणेच २२ अधिकृत भाषांसारखीच ही भाषा आहे.>स्टॅलिन म्हणाले, हिंदी लादली जाण्याला आमचा विरोधडीएमकेचे नेते एम.के. स्टॅलिन यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, हिंदी भाषा लादली जाण्याविरुद्ध आम्ही सतत विरोध करीत आहोत. मात्र, आज अमित शहा यांच्या वक्तव्याने धक्का बसला. देशाच्या एकतेवर यामुळे परिणाम होईल. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत. या मुद्यावर पक्षाच्या बैठकीत उद्या चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शहा