शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:51 IST

हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे असं शाह यांनी सांगितले.

नवी दिल्ली - देशात सुरू असलेल्या भाषावादावरून पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे. देशात JEE, NEET आणि CUET च्या परीक्षा एकूण ३ भाषांमध्ये होत आहेत. याआधी CRPF कॉन्स्टेबल भरतीसाठी लोकांकडे हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय होता. केवळ या दोन भाषेतच अर्ज भरू शकत होता मात्र आम्ही त्यात अन्य १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली. देशातील ९५ टक्के उमेदवार आज त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देत आहेत. येणाऱ्या काळात भारतीय भाषांचे भविष्य उज्ज्वल आहे असं शाह यांनी म्हटलं आहे.

हिंदी कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषा मिळून आपल्या स्वाभिमान कार्यक्रमाला अंतिम लक्ष्यापर्यंत पोहचवू शकतात. मागील काही दशकांपासून भाषेचा वापर भारतात विभागणी करण्यासाठी होत आहे. ते भारताला तोडू शकत नाहीत पण प्रयत्न करतायेत. आपल्या भाषा भारताला एकजूट करण्यासाठी सशक्त पर्याय बनतील हे आम्ही करू. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिकाधिक भाषा विभागावर काम करत आहोत. २०४७ मध्ये महान भारत विकसित होईल. यात भारतीय भाषांच्या विकासासाठी, समृद्धतेसाठी त्याचा वापर वाढेल असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय सरकारी कामकाजात भारतीय भाषांचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा. हे काम केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारनेही करायला हवे. त्यासाठी आम्ही सर्व राज्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना समजावून तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत असंही अमित शाह यांनी म्हटलं. 

६ जुलैला महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात मोर्चा

पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी केली आहे. या मोर्चाला कोणताही झेंडा नसणार आहे. फक्त मराठी हाच या मोर्चाचा अजेंडा असणार आहे, असे राज म्हणाले. तसेच राज यांनी या हिंदी सक्तीविरोधात सर्व राजकीय पक्षांनी या सामील व्हावे असे आवाहन केले आहे. राज्यातील प्रत्येक मराठी माणसाने मोर्चात सामील व्हावे असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.  

टॅग्स :hindiहिंदीRaj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाह