शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 16:04 IST

Anand Mishra Lok Sabha Election : माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.

Himanta Biswa Sarma In Buxar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याबाहेर देखील सभा घेत आहेत. बिहारमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांना गंभीर इशारा दिला. मिश्रा हे बिहारमधील बक्सर येथून अपक्ष लोकसभेच्या रिंगणात आहेत. भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणुकीनंतर तुम्हाला पुन्हा एकदा आसामला घेऊन जाईन, असा इशारा सरमा यांनी दिला. 

हिमंता बिस्व सरमा म्हणाले की, सर्वांनी भाजपला मतदान करायचे आहे. इथे जो आनंद मिश्रा फिरत आहे त्याला आम्ही निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आसामला घेऊन जाऊ. जे काही करायचे आहे ते तिथेच करा, बिहारमध्ये येऊन भाजपला डिस्टर्ब करू नका. आसाममध्ये त्यांचे अजूनही घर असून त्यांना मी तिथे घेऊन जाईन. तिथेच सुखी राहा इथे येऊन भाजपला डिस्टर्ब करण्यासाठी बक्सरमध्ये फिरत बसू नका.

आनंद मिश्रा निवडणुकीच्या रिंगणातमाजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. ते बिहारमधील बक्सर या लोकसभा मतदारंसघातून आपले नशीब आजमावत आहेत. आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजकीय इनिंग खेळण्याचे ठरवले. त्यांनी राजीनामा दिला तेव्हापासूनच ते लोकसभा निवडणूक लढतील अशी अटकळ बांधली जात होती. राजीनामा दिला तेव्हा मिश्रा आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. आनंद मिश्रा हे मूळचे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील पडसौरा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण व सांभाळ कोलकाता येथे झाला. आसाममधील डॅशिंग आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला. येथील नगांव जिल्ह्यात त्यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली होती. मिश्रा यांच्या वडिलांचे मूळ गाव हे बक्सर जिल्ह्यात आहे. मागील काही महिन्यांपासून माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी बक्सर जिल्ह्यात आपला सक्रिय सहभाग दर्शवल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, बक्सर हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ असून येथील मागील ७ लोकसभा निवडणुकांपैकी ६ वेळा ब्राह्मण उमेदवार विजयी झाला आहे, तेही भाजपाच्या कमळ चिन्हावर. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपा नेते अश्विनी चौबे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या अगोदर भाजपाचे लाल मुनी चौबे हे ४ वेळा येथून संसदेत गेले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BiharबिहारBJPभाजपा