शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

हिमांशू रॉय यांची 'ही' डरकाळी बघा... तुम्हीही म्हणाल, 'बंदे मे था दम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 16:04 IST

अनेक हायप्रोफाईल केस अगदी समर्थपणे हिमांशू रॉय यांनी हाताळल्या.

मुंबई- डॅशिंग आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येनं संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हिमांशू रॉय यांनी केलेलं काम आजही सगळे कौतुकाने सांगत आहेत. अनेक हायप्रोफाईल केस अगदी समर्थपणे हिमांशू रॉय यांनी हाताळल्या. हिमांशू रॉय पोलीस दलात कार्यरत असताना मोठ्या मोठ्या गुन्हेगारांनाचाही थरकाप उडायचा, अशी प्रतिक्रिया आज सगळीकडून ऐकायला येते आहे. काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील त्यांचं एक वक्तव्य सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

'मी असताना मुंबईला हात लावणं कठीणच नाही, तर अशक्य आहे', असं वक्तव्य हिमांशू रॉय यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं होतं. हिमांशू रॉय हे दहशवादविरोधी पथकात कार्यरत असताना त्यांनी अनेक दहशतवादी संघटनांची माहिती समोर आणली होती. हिमांशू रॉय यांच्या फक्त नावानेच तुरूंगात असलेले आरोपी थरथर कापायचे 

हिमांशू रॉय यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात नाशिकमधून केली. नाशिकचे ते त्यावेळी सर्वात तरूण पोलीस अधीक्षक होते. 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला.  नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१ मध्येही काम केलं.  नाशिक शहर पोलीस आयुक्त (२००४-२००७) पदावर कार्यरत होते. 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं. हिमांशू रॉय यांनी सायबर सेलमध्येही काम केलं. राज्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक पद त्यांनी सांभाळलं.  

टॅग्स :Himanshu Royहिमांशू रॉयSuicideआत्महत्या