शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नवरा मुलगा 200KM दूर, भूस्खलनाने रोखली वरात; वधु-वराने ऑनलाइन उरकले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:59 IST

या अनोख्या ऑनलाईन लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.

शिमला : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातून विध्वंसाच्या बातम्या समोर येत आहेत. पण, अशा कठीण परिस्थितीमध्येही एका कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला आहे. शिमल्यातील एका तरुणाचे लग्न ठरले होते, पण पावसामुळे तो कुणीच लग्नाला जाऊ शकले नाही, यानंतर कुटुंबाने शक्कल लढवत चक्क ऑनलाईन लग्न केले. 

सविस्तर माहिती अशी की, शिमला जिल्ह्यातील कोटगढ येथील रहिवासी ​​आशिष सिंघा, याचे कुल्लू जिल्ह्यातील भुंतर येथे राहणाऱ्या शिवानी ठाकूरशी लग्न जमले होते. आशिष आणि शिवानीचे लग्न सोमवारी(दि.10) रोजी होणार होते, पण मुसळधार पावसामुळे लग्न रद्द करण्याची वेळ आली. पण, अखेर त्यांनी एक शक्कल लढवली आणि ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

या जोडप्याने ना सात फेरे घेतले, ना एकमेकांना हार घातले, ना सिंदूर लावला, ना मंगळसूत्र घातले. व्हिडिओ कॉलद्वारे वधून आणि वर समोरासमोर आले आणि पुजाऱ्याने व्हिडिओ कॉलवरच मंत्रोच्चार म्हणथ त्यांचे लग्न लावून दिले. शक्य होतील तितके विधी ऑनलाईन पार पडले. आता या अनोख्या ऑनलाईन लग्नाची चर्चा राज्यभर रंगत आहे.

वधू-वराच्या नातेवाईकांनी सांगितले की, पावसामुळे हिमाचलकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. या पावसात लग्नाची वरात नेणे अशक्य होते. अशा परिस्थितीत लग्न रद्द करण्याऐवजी ऑनलाइन लग्नाची कल्पना सुचली. यानंतर दोन्ही कुटुंबात सहमती झाली आणि वधू-वराचे ऑनलाइन लग्न झाले. इंटरनेटमुळे हा ऑनलाईन विवाह कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडला.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊसlandslidesभूस्खलनmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार