शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

हिमाचल प्रदेशात गडकरींसमोरच राडा, SP अन् मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यात लाथा-बुक्क्यांनी हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 19:23 IST

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी गौरव यांच्यात जबरदस्त हाणामारी

कुल्लू - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या स्वागतासाठी भुंतर येथे गेलेल्या मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी गौरव यांच्यात जबरदस्त हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.  अचानक झालेल्या या झटापटीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात संरक्षण कर्मचारी एसपींना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. मात्र, ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही. (Himachal Pradesh scuffle between cm jairam thakur security officials and kullu SP in front of union minister Nitin Gadkari)

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितन गडकरी बुधवारी मनाली दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर त्यांच्या स्वागतासाठी ते भुंतर एअरपोर्टवर गेले होते. वाटेत काही फोरलेन प्रभावित शेतकरीही त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. या शेतकऱ्यांना पाहून गडकरींनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले. यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूरही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले.

बढिया भाऊ!! वाहतूक कोंडी पाहून नितीन गडकरी स्वतःच गाडीतून उतरले, अन्...

याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला असलेले सुरक्षा कर्मचारी आणि एसपी कुल्लू यांच्यात अचानकपणे झटापट झाली. मात्र, ही झटापट नेमकी का झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचारी एसपींना लाथ मारताना स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेनंतर अफवादेखील उठत आहेत. मात्र, यावर कुणीही भाष्य करायला तयार नाही. घटना समोर आल्यानंतर लोक एसपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतानाही दिसून आले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसBJPभाजपा