शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलमध्ये भाजपा सत्तांतराचा ट्रेंड बदलणार की काँग्रेस चमत्कार घडवणार? समोर आला असा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 19:20 IST

himachal pradesh opinion poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराचा ट्रेंड गेल्या काही निवडणुकांपासून सुरू आहे. त्यामुळे यावेळी हा सत्तांतराचा ट्रेंड कायम राहणार की, भाजपा सत्ता कायम राखणार, याबाबत उत्सुकता आहे.

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार ६८ आमदारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराचा ट्रेंड गेल्या काही निवडणुकांपासून सुरू आहे. त्यामुळे यावेळी हा सत्तांतराचा ट्रेंड कायम राहणार की, भाजपा सत्ता कायम राखणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी विविध वाहिन्यांचे ओपिनियन पोल समोर येऊ लागले आहेत.

इंडिया टीव्हीने केलेल्या ओपिनियनमधून हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी दर पाच वर्षांनी होणाऱ्या सत्तांतराचा ट्रेंड बदलणार असल्याचा कल वर्तवण्याक आला आहे. या ओपिनियन पोलनुसार भाजपाला ४६ टक्के, काँग्रेसला ४२ टक्के आणि आपला केवळ २ टक्के जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी हिमाचलमध्ये सत्तेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे. 

इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला ४१ तर काँग्रेसला २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये दोन जागा जाण्याची शक्यता आहे. मात्र मोठा गाजावाजा करणाऱ्या आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशमध्ये खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला  आहे. 

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकींसाठीच्या प्रचाराने जोर धरला आहे. वेगवेगळी आश्वासने सर्वच पक्षांकडून दिली जात आहेत. आता हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.   

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप