शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! मंडपात नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 09:24 IST

Groom dies of heart attack before wedding : लग्नाआधीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सुखी संसार सुरू होण्याआधीच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवी दिल्ली - घरात लग्नाची, नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. लग्नाआधीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सुखी संसार सुरू होण्याआधीच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली. मंडपातच नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा अचानक मृत्यू आल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लग्नाची तयारी सुरू असताना नवरदेवाच्या छातीत दुखू लागलं आणि काही क्षणांत त्याचा मृत्यू झाला. घरामध्ये लग्नासाठी जोरदार तयारी सुरू असतानाच वरातीऐवजी अंत्ययात्रा काढायची वेळ कुटुंबीयांवर आली आहे, हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील एका तरुणाचं लग्न ठरलं होतं. प्रमोद असं या तरुणाचं नाव होतं. तो सुखी संसाराची स्वप्न पाहत होता. रविवारी त्याचं लग्न होतं. 

लग्नाच्या दिवशी नवरदेवाने गमावला जीव

घरामध्ये लग्नासाठी पाहुणेमंडळी, मित्रमंडळी जमली होती. आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतानाच ही घटना घडली. अचानक नवरदेवाच्या छातीत कळ आली. छातीत कळ आलेल्या नवरदेवाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं. हसत्या खेळत्या घरात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नIndiaभारत