शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Crime: शिक्षकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:27 IST

School Teacher Sexually Harassing 24 Girls: २४ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सरकारी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली.

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून संतापजनक प्रकार समोर आला. शाळेतील २४ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील तपसाला सुरुवात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे छळाची तक्रार केली होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळा शाळा गाठून शिक्षकाला अटक केली. शाळा प्रशासनाने सांगितले की, शुक्रवारी २४ विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शिक्षकाने विद्यार्थिनींना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शाळा प्रशासनाने सांगितले की, तक्रार शाळेच्या लैंगिक छळ विरोधी समितीकडे पाठवण्यात आली. विद्यार्थिनींनी लेखी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांनी पीडितांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी बहुतेक पालकांना आपल्या मुलीच्या छळाबद्दल काहीच माहिती नव्हती, असे समजले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (लैंगिक छळ) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश