शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Himachal Pradesh Byelections: पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका, एका लोकसभेसह तीन विधानसभा जागांवर काँग्रेस विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 17:04 IST

Himachal Pradesh By-elections: मंडी लोकसभेच्या जागेवर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याो पत्नी प्रतिभा सिंह यांनी मोठा विजय मिळवला.

शिमला: हिमाचल प्रदेश(Himachal Pradesh) मधील मंडी लोकसभेसह तीन विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुन परभाव झाला आहे. चारही जागांवर काँग्रेसने मोठा विजय मिळवलाय. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृहजिल्हा असलेल्या मंडी लोकसभेची जागाही भाजपला वाचवता आली नाही. याशिवाय अर्की, फतेहपूर आणि जुब्बल-कोटखई या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडी लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून 8766 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. त्यांना 365650 मते मिळाले, तर भाजपचे उमेदवार कुशल सिंह ठाकूर यांना 356884 मते मिळाली. पोटनिवडणुकीत एकूण 742771 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 12626 जणांनी NOTA चे बटण दाबले आहे.

विधानसभेचे निकालजुब्बल-कोटखाई विधानसभा मतदारसंघ: रोहित ठाकूर(काँग्रेस) यांना 29447 मते, चेतन ब्रगटा (अपक्ष) यांना 23344 आणि नीलम सराईक (भाजप) यांना जुब्बल-कोटखई जागेवरून केवळ 2584 मते मिळाली. भाजप उमेदवाराला आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही.

फतेहपूर विधानसभा मतदारसंघः फतेहपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भवानी सिंह पठानिया यांनी 5789 मतांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या 24 टप्प्यांत भाजपचे उमेदवार बलदेव ठाकूर यांना 18,660, भवानी सिंह पठानिया यांना 24449 आणि जनक्रांती पक्षाचे पंकज दर्शी यांना 375, अशोक सोमल(अपक्ष) 295 तसेच अपक्ष उमेदवार डॉ. राजन सुशांत यांना 12927 मते मिळाली. येथे तिरंगी लढत झाली असली तरी काँग्रेसने येथून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.

अर्की विधानसभा मतदारसंघ : अर्की विधानसभा जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या गोटात गेली आहे. याआधी वीरभद्र सिंह आमदार होते, मात्र त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. आता येथून संजय अवस्थी विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या पराभवावर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पोटनिवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. शिमल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही जनादेश स्वीकारतो आणि 2022 पूर्वी उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पक्षांतर्गत काही लोकांनी आत राहूनही पक्षाची कामे केलेली नाहीत, त्यांची यादी तयार करून पक्ष हायकमांडला पाठवणार आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशHimachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017Himachal Pradesh Lok Sabha Election 2019हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपा