शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेश निवडणुकीत 73 वर्षीय धूमल भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे असणार उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:11 IST

शिमला- हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. भाजपानं एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे.

शिमला- हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. भाजपानं एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. 73 वर्षीय प्रेमकुमार धूमल हे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. ते राजगडमध्ये बोलत होते. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून वीरभद्र सिंह हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं होतं. अमित शाह यांनी वीरभद्र सिंह यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. वीरभद्र स्वतः केलेल्या कामांचा हिशेब देत नाहीत. तसेच भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. मात्र भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढत आहे, हा प्रश्न नेहमीच विचारतात. भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये 'प्रेमकुमार धूमल' यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहे, हेच माझं त्यांना हे प्रत्युत्तर आहे. भाजपा देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, तर हिमाचल प्रदेशमध्ये धूमल यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवत असल्याचं शाहांनी सांगितलं.धूमल यांनी हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रिपद याआधी सांभाळलं आहे. सध्या ते विरोधी पक्षनेते असून, येत्या 18 डिसेंबरला ते पुन्हा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रेमकुमार धूमल यावेळी हमीरपूर या आपल्या पारंपरिक मतदारसंघाऐवजी सुजानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आलेला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुकांपैकी 68 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह यांनी या उमेदवारांची यादीची घोषणा केली असून, यादीत मोठ्या नावांचा समावेश आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्तीच्या ऊनामधून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. अनेक मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत. सध्याचे विद्यमान आमदार रिखी राम कोंडल यांचीही झंडुता मतदारसंघातून नाव वगळण्यात आलं आहे. तसेच सुंदरनगरहून रुप सिंह ठाकूर व कुल्लूमधून बंजारच्या खिमी राम शर्मा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच सहा महिला उमेदवारांनाही भाजपानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेश