शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Himachal Pradesh Election Result: अवघ्या सहा महिन्यात सत्ता खेचून आणली; हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह यांचे नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:30 IST

Himachal Pradesh Election Result: सहावेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांच्या पत्नीचे नाव सध्या चर्चेत आहे.

Himachal Pradesh Election Result: भारताच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात वसलेल्या हिमाचल प्रदेशातकाँग्रेसने भाजपची सत्ता उलथून लावली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालासोबतच आता मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत काँग्रेस सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यासोबतच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचीही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे निवडून आलेले आमदार ठरवतील, असे प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे. पण, प्रतिभा सिंह मुख्यमंत्री होतील, अशी दाट शक्यता आहे. 

कोण आहेत प्रतिभा सिंह?प्रतिभा सिंह या वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. वीरभद्र हे सहा वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1998 मध्ये त्या सक्रिय राजकारणात आल्या. मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. यामध्ये भाजपचे महेश्वर सिंह आणि त्यांचे मेहुणे यांनी त्यांचा सुमारे 1.25 लाख मतांनी पराभव केला. महेश्वर सिंग हे त्यांचे मेहुणे.

जयराम ठाकूर यांचा मोठ्या फरकाने पराभव त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा यांनी दुसऱ्यांदा नशीब आजमावले. यात त्यांनी महेश्वर यांच्याकडून जुन्या पराभवाचा बदला घेत संसदेत पोहोचल्या. 2012 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वीरभद्र सिंह यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. यानंतर 2013 मध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये प्रतिभा यांनी विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा प्रचंड मतांनी पराभव केला.

हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली2014 साली मोदी लाटेत प्रतिभा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचा भाजपच्या रामस्वरूप शर्मा यांनी 39 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. 26 एप्रिल 2022 रोजी काँग्रेस हायकमांडने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. सहा महिन्यांच्या या जबाबदारीत प्रतिभा यांनी आपली राजकीय प्रतिभा सिद्ध केली. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा