शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Himachal Pradesh Election: प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री करण्यास पक्षाचा नकार; 'ऑपरेशन लोटस'ची शक्यता..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:57 IST

Himachal Pradesh Election: प्रतिभा सिंह यांना 25 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत.

Himachal Pradesh Election: गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी, हिमाचल प्रदेशातकाँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आणि हिमाचलच्या विजयाच्या शिल्पकार प्रतिभा सिंह मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत, पण पक्ष नेतृत्वाला त्या मुख्यमंत्री नको आहेत. वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबातून सीएम न झाल्यास पक्षात फूट पडेल, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

...तर पक्षात फूट पडेलमीडिया रिपोर्ट्सनुसार, वीरभद्र कुटुंबाला 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा प्रतिभा सिंह यांच्या कॅम्पने केला आहे. हिमाचलमध्ये पंजाबप्रमाणे दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवण्याची चूक करू नये, असे समर्थकांना वाटते. शिवाय, वीरभद्र यांच्या नावावर निवडणूक लढवली, त्यामुळे  मुख्यमंत्रिपदाचा अधिकार वीरभद्र कुटुंबाचाच आहे, असेही त्यांची मत आहे. सध्या केंद्रीय पर्यवेक्षक आणि प्रभारी राजीव शुक्ला यांची भेट घेऊन प्रतिभा सिंह आपली बाजू मांडत आहेत.

पक्ष नेतृत्वाचा नकारहिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांना खासदारपदावरून हटवून मुख्यमंत्री बनवण्यास हायकमांड अनुकूल नसल्याची माहितीही मिळत आहे. मंडी जिल्ह्यातील विधानसभेच्या 10 पैकी 9 जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत मंडी लोकसभा जागेची लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस हायकमांडला नकोय. दरम्यान, ओबेरॉय हॉटेलबाहेर वीरभद्र समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येतीये. 

हे नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याच्या विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मुकेश अग्निहोत्री यांचाही या शर्यतीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेस