उत्तराखंडमधील कुमाँऊ जंगलात हिमबिबट्या
By Admin | Updated: July 7, 2015 23:25 IST2015-07-07T23:25:32+5:302015-07-07T23:25:32+5:30
उत्तराखंडमधील कुमाँऊ जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात हिमबिबट्याचे दर्शन घडले असून, अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या वाघाचे प्रथमच दर्शन घडल्याचे वनअधिकारी राजेंद्रसिंग बिश्त यांनी सांगितले.

उत्तराखंडमधील कुमाँऊ जंगलात हिमबिबट्या
नैनिताल : उत्तराखंडमधील कुमाँऊ जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात हिमबिबट्याचे दर्शन घडले असून, अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या वाघाचे प्रथमच दर्शन घडल्याचे वनअधिकारी राजेंद्रसिंग बिश्त यांनी सांगितले. दुर्मिळ वाघाचे दर्शन घडणे ही अत्यंत आनंदाची बाब असून, जगातील वन्य प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करावा, अशी ही घटना असल्याचे बिश्त यांनी म्हटले आहे.
कुमाँऊ जंगलातील वरच्या डोंगराळ भागातील कॅमेऱ्यावर या वाघाचे छायाचित्र दिसले आहे. डोंगराळ जंगलात वरच्या भागात बर्फ असतो, या बर्फाळ भागात दुर्मिळातील दुर्मिळ वाघ असल्याचा हा पुरावा आहे, असे बिश्त यांनी म्हटले आहे. हा कॅमेरा दोन महिन्यांपूर्वी ४,१०० मीटर उंचीवरील सुंदरधुंगा हिमनदीत बसविण्यात आला होता. हा भाग बागेश्वर जंगलात आहे. (वृत्तसंस्था)