शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाला पाहताच अपहरणकर्ते पळाले, आयएनएस चेन्नईची मोहीम फत्ते; १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह २१ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 08:19 IST

भारतीय नौदलाच्या सागरी ‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत जहाजावरील १५ भारतीय कर्मचारी सदस्यांसह २१ जणांची सुटका केली.

नवी दिल्ली : अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ शुक्रवारी अपहरण झालेल्या जहाजावरील भारतीय नौदलाचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. भारतीय नौदलाच्या सागरी ‘मार्कोस’ कमांडोंनी थेट जहाजावर उतरत जहाजावरील १५ भारतीय कर्मचारी सदस्यांसह २१ जणांची सुटका केली. भारतीय नौदलाला पाहताच अपहरणकतर्ते पळून गेले, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एमव्ही लिला नॉरफोक’या व्यावसायिक जहाजाच्या अपहरणाला प्रत्युत्तर म्हणून नौदलाने एक युद्धनौका, सागरी गस्ती विमान ‘पी-८ आय’ आणि लांब पल्ल्याचे प्रीडेटर एमक्यू ९ बी ड्रोन तैनात केले होते. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आघाडीची युद्धनौका आयएनएस चेन्नईला तिच्या चाचेगिरी विरोधी गस्तीपासून वळवण्यात आले आणि तिने उत्तर अरबी समुद्रात दुपारी ३:१५ वाजता अपहृत जहाज अडवले. मोहिमेवर तैनात केलेल्या युद्धनौकेवर उपस्थित भारतीय नौदलाचे सागरी कमांडो व्यापारी जहाजावर चढले आणि त्यांनी ताबा मिळवण्याची पुढील कारवाई केली.

चिंता वाढलीगुरुवारी संध्याकाळी पाच ते सहा अज्ञात सशस्त्र चाचे जहाजावर चढले आणि त्यांनी जहाजाचा ताबा मिळवला, असा संदेश एमव्ही लिला नॉरफोक जहाजाने ब्रिटनच्या समुद्री व्यापार प्रक्रिया (यूकेएमटीओ) पोर्टलवर पाठविला होता. त्यानंतर समन्वयातून भारतीय नौदलाने कारवाई केली. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हौती अतिरेक्यांनी हल्ले वाढवल्याबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अपहरणाची घटना घडली आहे.

नौदल म्हणते...- जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीयत्वाबाबत नौदलाकडून कोणतीही स्पष्टता नसली तरी त्यापैकी १५ भारतीय असल्याचे कळते.- भारतीय नौदल आंतरराष्ट्रीय भागीदार आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशांसह या प्रदेशातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे नौदलाने म्हटले आहे.

आधीच्या काही घटना..- २१भारतीय कर्मचारी सदस्यांसह लायबेरियन ध्वजांकित जहाज एमव्ही केम प्लूटो हे २३ डिसेंबर रोजी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य झाले होते.- त्याच दिवशी भारताकडे जाणारे आणखी एक व्यावसायिक तेल टँकरवर दक्षिणी लाल समुद्रात संशयास्पद ड्रोन हल्ला झाला होता. त्या जहाजात २५ भारतीय कर्मचारी होते. - माल्टा ध्वजांकित जहाज एमव्ही रुएनचे १४ डिसेंबर रोजी समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल