देणी वसूल करण्यासाठी अपहरण करणार्यास अटक; दोन फरार
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:58+5:302015-03-08T00:30:58+5:30
भाईंदर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत देणी वसूल होत नसल्याने थेट देणेकराचेच अपहरण केल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी एका अपहरणकर्त्याला अटक केली असून दोनजण फरार असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक संपत चव्हाण यांनी सांगितले आहे.

देणी वसूल करण्यासाठी अपहरण करणार्यास अटक; दोन फरार
भ ईंदर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत देणी वसूल होत नसल्याने थेट देणेकराचेच अपहरण केल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी एका अपहरणकर्त्याला अटक केली असून दोनजण फरार असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक संपत चव्हाण यांनी सांगितले आहे. मुंबईच्या लादीबाजार परिसरातील मंमदी बिल्डींगमध्ये राहणारा संजय रमणिकलाल शेठ (५२) याच्याकडून शामल बुद्धदेव अा (४६) रा. ए/१०१, क्लिट अपार्टमंेट, ६० फुट रोड, भाईंदर (प) याने सुमारे दीड लाख रु. उसने घेतले होते. घेतलेली रक्कम परत करण्यासाठी त्याने शामलकडे तगादा लावला होता. तसेच अनेकदा फोन करुनही शामल त्याला प्रतिसाद देत नसल्याने २ मार्च रोजी रात्री १०.३० वा. च्या सुमारास त्याने त्याच्या घरी जाऊन घेतलेली रक्कम परत करण्याबाबत विचारणा केली. त्याला नकार दिल्यानंतर संजयने त्याला जबरदस्ती रिक्षात बसवून पुढे टॅक्सीद्वारे आपल्या राहत्या घरी नेले. याप्रकरणी शामलची पत्नी सिमा हिने भाईंदर पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ४ मार्च रोजी त्याची सुटका करुन संजयला अटक केली. त्याला सहकार्य करणारे त्याची पत्नी व एक साथीदार मात्र फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी/ राजू काळे)