शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात 61,164 किमी लांबीच्या महामार्गांची कामे सुरु- सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 11:42 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी महामार्गांच्या कामाची माहिती राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली- भारतामध्ये 61,164 किमी महामार्ग बांधणीची कामे सुरु असून त्या प्रकल्पांची किंमच 6 लाख 45 हजार कोटी असल्याची माहिती सरकारने आज संसदेत दिली.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यसभेत लेखी दिलेल्या उत्तरामध्ये 6.45 लाख कोटी रुपयांचे महामार्गांचे बांधकाम देशात सुरु असल्याचे नमूद केले आहे. हे सर्व मार्ग 1,873 प्रकल्पांच्या अंतर्गत पूर्ण होत आहेत असेही त्यात नमूद केले आहे.  2019 च्या मार्च महिन्यापर्यंत 295 मोठे प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकारने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात केलेल्या वेगवान प्रगतीचे कौतुक केले जात आहे. या सरकारने पहिल्या चार वर्षांमध्येच 28,531 किमी राष्ट्रीय महामार्गांची बांधणी केली आहे तर संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये 16,505 किमी इतक्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते.

रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. 2017-18 या वर्षी राष्ट्रीय महामार्गांची सर्वात जास्त निर्मिती झाली. या वर्षभरात 9 हजार 829 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले तर 2016-17 या वर्षभरात 8 हजार 231 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले.2015-16 या वर्षी 6 हजार 61 किमी लांबीचे तर 2014-15 या वर्षी 4 हजार 410 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते. 2010-11 या वर्षी 4,500 किमीचे तर 2011-12 या वर्षभरात केवळ 2,013 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले. 2012-13 या वर्षी 5,732किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले होते.

टॅग्स :highwayमहामार्गGovernmentसरकारNitin Gadkariनितीन गडकरीRajya Sabhaराज्यसभा