शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann: हाय व्होल्टेज! भगवंत मान राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले, इकडे केजरीवालांनी घेतली पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:46 IST

Arvind Kejriwal Meeting with Punjab Officers: पंजाबचे मुख्यमंत्री कोण? भगवंत मान की केजरीवाल; विरोधकांसह सामान्य पंजाबी नागरिक प्रश्न विचारू लागले.

अरविंद केजरीवालांच्या पक्षाने पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि सत्ता स्थापन केली आहे. परंतू आज एक विचित्र प्रकार घडला आहे, ज्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे निवडणुकीआधी मान हे नावाचे मुख्यमंत्री असतील, केजरीवालच सरकार चालवतील, अशा विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीला आले होते. त्याचवेळी पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलविण्यात आली होती. हे अधिकारी दिल्लीत आले होते. तेव्हा केजरीवाल तिथे असल्याने त्यांनीच ती घेतली आणि गोंधळ उडाला. केजरीवाल हे पक्षाचे प्रमुख आहेत परंतू पंजाबचे नाहीत. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी केजरीवालाचा काय संबंध, ते पंजाबचे मुख्यमंत्री आहेत का, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 

नवज्योत सिंग सिद्धू यांनी तर हे वादळ आता एकेक मुखवटे फाडणार आहे. हा पंजाबचा अपमान आहे. संघराज्याचे स्पष्ट उल्लंघन असून आता रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्याचे दिसले आहे, असा आरोप केला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, वाईट घडणार याची भीती होती. अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षेपेक्षा आधीच पंजाब काबीज केला आहे. भगवंत मान हा रबर स्टॅम्प आहे, जे आम्ही आधीच म्हणालो होतो, अशी टीका केली आहे. केजरीवाल यांचे हे बैठक घेणे पंजाबी लोकांनाही आवडलेले नाही. काहींनी तशा प्रतिक्रिया देखील ट्विटवर पोस्ट केल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत, मग पंजाबचे मुख्यमंत्री खुर्चीवर का बसले आहेत? असा सवाल एका युजरने केला आहे. 

कशासाठी बैठक...केजरीवाल यांनी या अधिकाऱ्यांना पंजाबमध्ये ३०० युनिट वीज मोफत देण्याविषयी चर्चा करण्यासाठी बोलविल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला त्यांनी उर्जा मंत्र्यांनाही बोलावले नाही. मान यावर आज दुपारनंतर केजरीवाल यांच्याशी चर्चा करतील. यानंतर मोफत वीज देण्याचा निर्णय होईल असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवाल