शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तिहार तुरूंगात छोटा राजनला विशेष सुविधा; कैद्यांकडून तुरुंग प्रशासनाविरोधात उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 17:47 IST

काही महिन्यांपूर्वी याच नीरज बवानाकरवी छोटा राजनला तिहारच्या तुरूंगातच संपवण्याचा कट उघडकीला आला होता.

नवी दिल्ली: कुख्यात गुंड छोटा राजन याला तिहार तुरुंगात देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर तेथील कैद्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या तुरुंग प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राजनला पुरविण्यात येणाऱ्या विशेष सुविधांना विरोध करत मोहम्मद शहाबुद्दीन आणि नीरज बवाना या दोन कैद्यांनी उपोषणही सुरू केले आहे. तुरुंग प्रशासन राजनला इतर कैद्यांच्या तुलनेत झुकते माप देत असल्याचे या दोघांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी याच नीरज बवानाकरवी छोटा राजनला तिहारच्या तुरूंगातच संपवण्याचा कट उघडकीला आला होता. त्यानंतर आता बवानाने थेट न्यायालयाला पत्र लिहून छोटा राजनला विशेष सुविधा पुरविण्यात येत असल्याची तक्रार केली. तिहार तुरुंगातील कैद्यांना चांगेल भोजन आणि औषधं उपलब्ध करून दिली जात नाहीत, असे बवानाने पत्रात म्हटले आहे. याविरोधात बवाना सध्या तुरुंगातच उपोषणाला बसला आहे. याशिवाय, खुनाच्या खटल्यात तुरूंगात असलेला राजदचा माजी खासदार शहाबुद्दीन हादेखील बवानाच्या जोडीला तुरूंगात बसला आहे. त्यानेही छोटा राजनला तुरुंग प्रशासनाकडून विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्यासह अन्य कैद्यांना ज्या बराकींमध्ये ठेवण्यात आले आहे, तिथे मोठ्याप्रमाणावर डास आणि अन्य कीटक आहेत. तसेच बराकींच्या भिंतीची वाळू जमिनीवर पडत आहे. कैद्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले जात नाही, तसेच त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, अशा अनेक तक्रारी शहाबुद्दीन याने न्यायालयाकडे केल्या आहेत.  

टॅग्स :jailतुरुंगCrimeगुन्हा