हायकोर्टाने मनपाला कचऱ्यावरून फटकारले

By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30

नागपूर : शहरातील प्रत्येक घरातून कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी घाण पसरली आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी सांगून महानगरपालिका व कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीला फटकारले. तसेच, यासंदर्भात दोघांनाही १७ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत.

The High Court rebuked the municipal waste | हायकोर्टाने मनपाला कचऱ्यावरून फटकारले

हायकोर्टाने मनपाला कचऱ्यावरून फटकारले

गपूर : शहरातील प्रत्येक घरातून कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी घाण पसरली आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी सांगून महानगरपालिका व कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीला फटकारले. तसेच, यासंदर्भात दोघांनाही १७ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून नागरिकांचे जीवन व आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेली कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी आपले कर्तव्य योग्यरीतीने बजावण्यात अपयशी ठरत आहे. जैविक व अजैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्या जात नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यामुळे डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा प्रकोप वाढून अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत, याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका व्यावसायिक अनिल आग्रे यांनी दाखल केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली.

Web Title: The High Court rebuked the municipal waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.