शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Farmers Protest : रिलायन्स जिओच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची पंजाब, केंद्र सरकारला नोटीस

By जयदीप दाभोळकर | Updated: January 5, 2021 17:27 IST

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिटेल आर्म्स आणि सहकारी कंपन्यांच्या भविष्यात कॉर्पोरेट अथवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचा कोणताही विचार नसल्याचं कंपनीची माहिती

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनादरम्यान १,५०० टॉवर्सना लक्ष्य केल्याचा जिओचा आरोपया प्रकरणी ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे पंजाब, केंद्र सरकारला न्यायालयाचा आदेश

मोबाईल टॉवर्स आणि टेलिकॉम उपकरणांचं शेतकरी आंदोलनादरम्यान नुकसान केल्याप्रकरणी रिलायन्स जिओनं न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मंगळवारी यावर पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं रिलायन्स जिओचे टॉवर्स आणि टेलिकॉम उपकरणांचं नुकसान झाल्याप्रकरणी नोटीस जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंजाबमधीलरिलायन्स जिओचे मोबाईल टॉवर्स आणि अन्य संपत्तींचं नुकसान करणाऱ्यांविरोधात कंपनीनं कारवाईची मागणी केली होती. या याचिकेवरी सुनावणीदरम्यान न्यायालयानं पंजाब आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. जिओनं दाखल केलेल्या याचिकेत पंजाबमधील आपल्या १ हजार ५०० टेलिकॉम टॉवर्सना मोठं नुकसान झालं. त्यामुळे ते टॉवर्स काम करत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पंजाबमध्ये रिलायन्स जिओचे १४ दशलक्ष ग्राहक आहेत. याव्यतिरिक्त जिओनं आपल्या स्पर्धक कंपन्यांनीही शेतकरी आंदोलनाचा फायदा घेतल्याचा आरोप जिओनं केला आहे. आपली मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिटेल आर्म्स आणि सहकारी कंपन्यांच्या भविष्यात कॉर्पोरेट अथवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचा कोणताही विचार नसल्याचं जिओनं याचिकेद्वारे सांगितलं. याव्यतिरिक्त शेतीची जमीन खरेदी करण्यात कंपनीला रस नसून ती खरेदी केली जाणार नाही. तसंच शेतकऱ्यांना मजबूत करणं हेच आपलं उद्दिष्ट्य असल्याचंही कंपनीनं नमूद केलं. दरम्यान, उच्च न्यायालयानं पंजाब आणि केंद्र सरकारला ८ फेब्रुवारीपर्यंत याबाबत उत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती कंपनीच्या वकिल आशिष चोप्रा यांनी दिली.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओRelianceरिलायन्सFarmer strikeशेतकरी संपPunjabपंजाबCentral Governmentकेंद्र सरकार