हायकोर्टात जन्मठेप रद्द

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:30+5:302015-01-30T21:11:30+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे अमरावती जिल्‘ातील एका हत्याप्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द केली.

In the High Court, the life sentence cancellation | हायकोर्टात जन्मठेप रद्द

हायकोर्टात जन्मठेप रद्द

गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द केली.
प्रदीप बापुराव अवसरमोल (३८) असे आरोपीचे नाव असून तो देऊळवाडा, ता. चांदूर बाजार येथील रहिवासी आहे. त्याच्यावर सचिन रवालेची हत्या केल्याचा आरोप होता. सचिन व आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. यातून ही हत्या झाली असे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु, त्यांना हत्येचा हेतू सिद्ध करता आला नाही. ही घटना १४ ऑगस्ट २००९ रोजी घडली होती. सचिनची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. २४ जून २०११ रोजी अचलपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

Web Title: In the High Court, the life sentence cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.