हायकोर्टाचा न्याय
By Admin | Updated: December 25, 2015 23:58 IST2015-12-25T23:58:25+5:302015-12-25T23:58:25+5:30
अन्य महत्त्वाचे निर्णय

हायकोर्टाचा न्याय
अ ्य महत्त्वाचे निर्णय२२ जूनहायकोर्टाने कुश कटारिया या आठ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करणारा आयुष निर्मल पुगलिया (२६) याची दुहेरी जन्मठेप कायम ठेवतानाच त्याला भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत तिसऱ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच दिवशी पिंटू शिर्के हत्याकांडावरही निर्णय देण्यात आला. याप्रकरणात १५ पैकी ११ आरोपींना जन्मठेप झाली. त्यात विजय मते, राजू भद्रे, उमेश डहाके, रितेश गावंडे, किरण कैथे, कमलेश निंबर्ते, दिनेश गायकी, मारोती ऊर्फ नव्वा वलके आदींचा समावेश आहे. २८ जुलैहायकोर्टाच्या दणक्यामुळे शासनाने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर बंदी आणली. परिणामी यासंदर्भातील फौजदारी रिट याचिका निकाली काढण्यात आल्या. ३० सप्टेंबरपोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त करून पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्धची फौजदारी रिट याचिका निकाली काढण्यात आली. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी ही याचिका दाखल केली होती. दोन्ही गायक अश्लील गाणी गातात. यामुळे समाजावर वाईट परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे होते.१२ ऑक्टोबर दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची फाशीची शिक्षा हायकोर्टाने कायम केली. ही घटना झटाळा ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील होय. २९ ऑक्टोबरपांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात प्रलंबित खासगी तक्रार रद्द करून मर्डर गर्ल मल्लिका शेरावत ऊर्फ रिमा लांबाला दिलासा देण्यात आला. पांढरकवडा येथील शेतकरी रजनीकांत डालुराम बोरेले यांनी मल्लिकाच्या अंगप्रदर्शनाविरुद्ध २०१० मध्ये ही तक्रार दाखल केली होती.३० नोव्हेंबरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व प्राध्यापक डॉ. समीर गोलावार यांच्या बदलीवर स्थगिती देण्यात आली. राजकीय हस्तक्षेपामुळे या बदल्यांची खूप चर्चा झाली होती.२१ डिसेंबरकुश कटारिया या चिमुकल्याची हत्या करणाऱ्या आयुष निर्मल पुगलियाची संचित रजेची याचिका फेटाळून १००० रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवण्यात आला.