शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

High Court: "पत्नीने गुटखा खाल्ला, दारू प्यायली आणि मांस खाल्ले तर...", उच्च न्यायालयाचा अनोखा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:45 IST

पती पत्नीच्या वादावर छत्तीसगडच्या बिलासपूर उच्च न्यायालयाने एक अनोखा निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बिलासपूर उच्च न्यायालयानेघटस्फोटासंदर्भातील आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर एखादी पत्नी पुरुषांप्रमाणेच पान, गुटखा आणि दारूसह मांस खाऊन पतीचा छळ करत असेल तर ती देखील क्रूरताच आहे. बिलासपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या दुहेरी खंडपीठाने या कारणास्तव पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचे घोषित केले आहे.

दरम्यान, कोरबा जिल्ह्यातील बांकीमोंगरा येथील तरुणाने कटघोरा येथील तरुणीशी लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या सात दिवसांनी 26 मे 2015 रोजी सकाळी संबंधित तरूणाची पत्नी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. पतीने तिला उपचारासाठी नेले असता तिला दारू पिण्यासोबतच मांसाहार आणि गुटख्याचे व्यसन असल्याचे आढळून आले. याबाबत नातेवाईकांनी तिला समजावले मात्र, पत्नीने सासरच्यांशी गैरवर्तन करणे सुरूच ठेवले.

पतीने उच्च न्यायालयात घेतली धाव गुटखा खाल्ल्यानंतर ती महिला बेडरूममध्ये कुठेही थुंकायची आणि नकार दिल्यावर पतीसोबत भांडण करायची, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या महिलेने 30 डिसेंबर 2015 रोजी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. एवढेच नाही तर दोन वेळा छतावरून उडी मारून आणि नंतर दोनदा कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्नीच्या व्यापामुळे त्रस्त झालेल्या पतीने घटस्फोटासाठी कोरबा येथील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र, कौटुंबिक न्यायालयाने ही आपली गोपनीयता असल्याचे सांगत पतीची याचिका फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाचा अनोखा निर्णय लक्षणीय बाब म्हणजे या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द ठरवत पतीचे घटस्फोटासाठी केलेले अपील मान्य करून पत्नीकडून होणारा छळ ही क्रूरता असल्याचे म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडHigh Courtउच्च न्यायालयDivorceघटस्फोटmarriageलग्न