महाराष्ट्र, गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, देशभरात हायअलर्ट
By Admin | Updated: December 8, 2014 16:43 IST2014-12-08T16:43:14+5:302014-12-08T16:43:14+5:30
पाच संशयित दहशतवादी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशा-यावर भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

महाराष्ट्र, गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, देशभरात हायअलर्ट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - मध्यप्रदेशमधील तुरुंगातून पळालेले पाच संशयित दहशतवादी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशा-यावर भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. महाराष्ट्र, गुजरातसह देशभरातील अन्य प्रमुख शहरांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता असल्याने देशभराच हायअलर्ट देण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशमधील तुरुंगातून पाच संशयित दहशतवाद्यांनी पळ काढला होता. हे पाचही जण सिमी संघटनेशी संबंधीत होते. या पाच जणांनी बॅंकेमध्ये लुटमारी करुन दहशतवादी हल्ल्यासाठी पैसे जमवल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. आयएसआयच्या इशा-यावर हे हल्ले होतील अशी माहिती उघड झाली असून या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट देण्यात आला आहे.