शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:13 IST

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. याच तणावाचे रूपांतर शुक्रवारी हल्ल्यात झाले.

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. याच तणावाचे रूपांतर शुक्रवारी हल्ल्यात झाले. इस्रायलनेइराणवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणच्या अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजले आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. दुसरीकडे, इस्रायलमध्येही तात्काळ आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि दोन्ही देशांनी आपली हवाई हद्द बंद केली.

काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली!इराण आणि इस्रायलमधील या वाढत्या संघर्षामुळे जम्मू-काश्मीरच्या काही भागांत, विशेषतः शियाबहुल भागांमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना भीती आहे की, या तणावामुळे शुक्रवारी जुम्मा नमाजच्या वेळी शिया समुदायात तीव्र भावनिक प्रतिक्रिया उमटून निदर्शने किंवा हिंसाचार भडकू शकतो. त्यामुळे, काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिकच वाढवण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यामुळे आधीच तणावजम्मू-काश्मीरमध्ये आधीच तणावाची परिस्थिती आहे. २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात भारतीय आणि परदेशी नागरिक होते. या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि हल्ल्याला मदत करणाऱ्यांनाही शोधून काढले होते. त्यामुळे, पहलगाम हल्ल्यापासूनच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहेत.

भारताची काही विमाने रद्द, प्रवाशांना सतर्कतेचा इशारा!इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे, सुरक्षिततेचा विचार करून भारताने काही विमाने परत बोलावली आहेत. मात्र, दिल्ली विमानतळाने स्पष्ट केले आहे की, दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या विमानांवर फारसा परिणाम झालेला नाही; फक्त काही उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासासंबंधीच्या माहितीसाठी त्यांनी संबंधित विमान कंपनीशी थेट संपर्क साधावा आणि सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध