जाट आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणामध्ये 'हाय अलर्ट'
By Admin | Updated: June 5, 2016 12:10 IST2016-06-05T12:10:21+5:302016-06-05T12:10:21+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाने आज पुन्हा आंदोलनाची हाक दिल्याने हरयाणातील नऊ जिल्हे हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.

जाट आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणामध्ये 'हाय अलर्ट'
ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. ५ - आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाने आज पुन्हा आंदोलनाची हाक दिल्याने हरयाणातील नऊ जिल्हे हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. रोहतकमध्ये जाट समाजातील आंदोलक एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जाट समाजाने हरयाणा सरकारला १५ दिवसांचा अवधी दिला होता.
यावेळी आंदोलक शहरांऐवजी ग्रामीण भागांमध्ये आंदोलन करत आहेत. हरयाणातील परिस्थिती हाताळण्यासाठी निमलष्करी दलाच्या ५५ तुकडया ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती हरयाणाचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राम निवास यांनी सांगितले. आंदोलकांनी अडथळे उभारुन वाहतूक रोखू नये यासाठी राष्ट्रीय, राज्य महामार्गावर मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात आहे.
जमावबंदी रोखण्यासाठी काही ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात हरयाणात आरक्षणासाठी जाट समाजाने मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तीस जणांचा मृत्यू झाला होता. ३२० हून अधिक जखमी झाले होते. कोटयावधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.