शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:36 IST

गुरुवारी दुपारी अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.

गुजरातमधीलअहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघाताने अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ चित्रित करणारा १७ वर्षीय आर्यन मात्र या घटनेमुळे इतका हादरला आहे की, त्याला भविष्यात कधीही विमानात बसण्याची हिंमत होणार नाही, असे तो म्हणतो.

काय घडलं त्या गुरुवारी?अहमदाबादचा रहिवासी असलेला आर्यन याला विमानांचे व्हिडीओ बनवण्याची आवड आहे. दररोजप्रमाणे गुरुवारी दुपारी तो व्हिडीओ बनवत असताना, त्याला एक विमान खूप खालून उडताना दिसले. सुरुवातीला त्याला वाटले की, हे विमान धावपट्टीवर उतरणार आहे. मात्र, काही क्षणातच झालेल्या प्रचंड स्फोटाने आणि त्यानंतर आगीचे व धुराचे लोट पाहून आर्यन पूर्णपणे सुन्न झाला. हा थरारक आणि हृदयद्रावक क्षण त्याने आपल्या कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

आर्यनवर अपघाताचा मानसिक परिणामया अपघातानंतर आर्यनला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. "मला नेहमीच एकदा तरी विमानात बसायचे होते, पण या अपघातानंतर मी हिंमतच करू शकत नाही. मला वाटते की यामुळे मी आयुष्यभर विमानात चढूच शकणार नाही," असे आर्यनने सांगितले.

आर्यनच्या बहिणीनेही त्याच्या या अस्वस्थतेबद्दल सांगितले. ती म्हणाली, "अपघातानंतर माझा भाऊ खूप अस्वस्थ आहे. त्याने मला व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला की त्याला इथे राहायचे नाही, कारण हे ठिकाण खूप धोकादायक आहे. तो खूप घाबरलेला आहे आणि त्या दिवशी तो नीट बोलूही शकत नव्हता." आर्यनच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनेही याला दुजोरा दिला. "घटनेनंतर मी त्याला पाहिले, तेव्हा तो बोलू शकत नव्हता. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो रात्रभर जागा राहिला. तो शांत झाला आहे, पण अजूनही काहीही खात नाहीये," असे त्या म्हणाल्या.

अपघाताची भीषणतागुरुवारी दुपारी २ वाजता अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या ठिकाणीही अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. सरकारी आकडेवारीनुसार, या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेने आर्यनसारख्या अनेक निष्पाप लोकांच्या मनावर खोलवर परिणाम केला आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात