पनीरसेल्वम नेटीझन्समध्ये ठरले हिरो

By Admin | Updated: February 8, 2017 08:59 IST2017-02-08T08:59:01+5:302017-02-08T08:59:01+5:30

तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शशिकला विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर ते नेटीझन्समध्ये हिरो ठरले आहेत.

Heroine in Paneerslav Netsin | पनीरसेल्वम नेटीझन्समध्ये ठरले हिरो

पनीरसेल्वम नेटीझन्समध्ये ठरले हिरो

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 8 - तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शशिकला विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर ते नेटीझन्समध्ये हिरो ठरले आहेत. मरीना बीचवरील पत्रकार परिषदेत स्फोटक खुलासे केल्यानंतर त्यांचे अन्य पक्षातील नेत्यांनीही समर्थन केले आहे. सोशल मीडिया त्यांच्यामागे ठामपणे उभा राहिला आहे. मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडला असा आरोप त्यांनी केला. 
 
अण्णाद्रमुकमधूनही पनीरसेल्वम यांचे समर्थन करण्यात येत आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. अण्णाद्रमुकच्या आयटी शाखेचे सरचिटणीस हरी प्रभाकरन यांनी टि्वट करुन पनीरसेल्वम यांचे समर्थन केले. पदावरुन हटवले जाण्याची त्यांना भिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
शशिकलाचे पोस गार्डनला तर पनीरसेल्वम यांचे ग्रीनवेज रोड येथे निवासस्थान आहे. रात्री दोनशेहून अधिक कार्यकर्ते पनीरसेल्वम यांच्या घराबाहेर जमले होते. या कार्यकर्त्यांनी एमजीआर यांच्या चित्रपटातील गाणी लावली होती. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ही गाणी लावली जातात. शशिकलाचे विरोधक असलेले माजी मंत्री के.पी.मुनूसॅमी रात्री पावणेअकराच्या सुमारास पनीरसेल्वम यांच्या घरातून बाहेर पडले. 
 

Web Title: Heroine in Paneerslav Netsin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.