शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिरो मोटो कॉर्पची बनावट वेबसाईट; व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 09:05 IST

दोन लाख रुपये आता भरावेत, ते पुन्हा परत करण्यात येतील असेही सांगण्यात आले होते.

नवी दिल्ली : हिरो मोटो कॉर्पची बनावट वेबसाईट बनवून फ्रँचायजी देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. कंपनीचे खरे युआरएल  heromotocorp.com असे असताना ठगांनी heromotocorps.com असे केवळ एस जोडून हुबेहुब युआरएल बनवत हा गंडा घातला आहे. दिल्ली पोलीस या ठगांचा शोध घेत आहेत. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण खरे असल्याचे सांगितले आहे. बनावट वेबसाईटवर खऱ्या वेबसाईटनुसार नव्या शोरुमसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. तसेच हुबेहुब माहिती भरण्याचे रकानेही ठेवण्यात आले होते. याचबरोबर 2 लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. हा अर्ज भरणाऱ्या लोकांना या ठगांनी ऑनलाईन आणि फोनद्वारे संपर्क साधला होता. तसेच दोन लाख रुपये आता भरावेत, ते पुन्हा परत करण्यात येतील असेही सांगण्यात आले होते. यामुळे काही व्यापारी सतर्क झाले व त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. यानंतर हे प्रकरण उघड झाले. 

या बनावट युआरएलला एका प्रसिद्ध डोमेन रजिस्टर आणि वेब होस्टिंग कंपनीद्वारे बनविण्यात आले होते. या वेबसाईटला 7 जूनला बनविण्यात आले होते. पोलीस वेबसाईटचा आयपी अॅड्रेस आणि व्यापाऱ्यांना केलेल्या फोन नंबरची माहीती गोळा करत आहे. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पInternetइंटरनेटCrime Newsगुन्हेगारी