शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इथे भारत-पाकिस्तानचे लष्कर बनले मित्र, एकमेकांसोबत केला युद्धसराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:25 IST

भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत...

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत एकमेकांवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही देशांच्या सैन्याने एकत्र येऊन युद्धसराव केला असे सांगितल्यास कुणाला खरे वाटणार नाही. मात्र भारत आणि पाकिस्तानचे लष्कर सध्या रशियामध्ये एकत्र येऊन युद्धसराव करत आहेत. रशियातील चेल्याबिन्स्क येथे  शांतता मोहीम 2018 अंतर्गत शुक्रवारपासून हा संयुक्त युद्धसराव सुरू झाला आहे. या युद्धसरावामध्ये शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये समावेश असलेले सर्व देश सहभागी झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान हेसुद्धा चीनचा प्रभाव असलेल्या या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे हे दोन्ही देशांनीही या युद्धसरावात भाग घेतला आहे. या सरावाबाबत लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की "या युद्धसरावामुळे शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी असलेल्या देशांना दहशतवादविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण मिळेल. या प्रशिक्षणादरम्यान, औपचारिक चर्चा, कारवाईदरम्यान आपापसातील ताळमेळ, संयुक्त कमांडची स्थापना, कंट्रोल स्ट्रक्चर आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याबाबतच्या मॉक ड्रिलसारखा अभ्यास करण्यात येणार आहे."

या युद्धसरावामध्ये यजमान रशियाचे 1700, चीनचे 700 आणि भारताचे 200 जवान सहभागी झाले आहेत. भारताकडून पाठवण्यात आलेल्या जवानांमध्ये राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानrussiaरशिया