प्रेयसी दुर्लक्ष करते म्हणून तिच्या घराला आग लावली
By Admin | Updated: March 13, 2016 13:11 IST2016-03-13T13:11:56+5:302016-03-13T13:11:56+5:30
प्रेयसी दुर्लक्ष करते म्हणून २१ वर्षाच्या तरुणाने प्रेयसीचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील श्रीरामपूरामध्ये घडली.

प्रेयसी दुर्लक्ष करते म्हणून तिच्या घराला आग लावली
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १३ - प्रेयसी दुर्लक्ष करते म्हणून २१ वर्षाच्या तरुणाने प्रेयसीचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील श्रीरामपूरामध्ये घडली. मेघना असे जखमी तरुणीचे नाव असून, ती श्रीरामपूरमधील साईबाबानगर येथे रहाते. दीपक शिवकुमार असे आरोपीचे नाव आहे.
मेघना दुर्लक्ष करते म्हणून दीपकने शुक्रवारी मध्यरात्री मेघनाच्या घरावर पेट्रोल शिंपडून घर पेटवून दिले. इंजिनियरींगची विद्यार्थिनी असणारी मेघना ६० टक्के भाजली असून, तिला सेंट जॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे.
घराला आग लावल्यानंतर दीपक भितींवरुन उडी मारुन पळून गेला. शेजा-यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मेघनाचे वडील पी.नटराजन, आई अनुपमा आणि बहिण संजनाला वाचवले. दीपक एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करतो. चौकशीत त्याने आपणच हे कृत्य केल्याची कबुली दिली. हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी त्याच्या विरोधात नोंदवला आहे.