शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:14 IST

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई हा एक गँगस्टर आहे. त्याच्यावर अनेकांच्या हत्या केल्याचा आणि सेलिब्रिटींना धमकावल्याचा आरोप आहे. 

Lawrence Bishnoi : चंदीगड :  गेल्या अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. पण, तुरुंगात असून देखील लॉरेन्स बिश्नोई आपल्या गँगकडून अनेक धक्कादायक गोष्टी घडवून आणत आहे. लॉरेन्स बिश्नोई हा एक गँगस्टर आहे. त्याच्यावर अनेकांच्या हत्या केल्याचा आणि सेलिब्रिटींना धमकावल्याचा आरोप आहे. 

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला, करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामडी यांची हत्या असो किंवा अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण असो, या सर्व प्रकरणांमागे त्याचा हात असल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई जसजसा तुरुंग बदलत राहिला, तसतसा त्याच्या टेरर सिंडिकेटचा मोठ्या पद्धतीने विस्तार झाला आहे. गुंड आणि कुख्यात गुन्हेगार त्याच्या संपर्कात आले आणि त्याने सर्वांना सोबत घेतले. आज जगभरात पसरलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये 700 हून अधिक शूटर्स आणि 80 हून अधिक गुंड असल्याचे सांगितले जाते.

लॉरेन्स बिश्नोईचे नेटवर्क जगभर पसरलेले आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आदी देशांतही त्याचे साथीदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये गोल्डी ब्रार, लेखप्रीत आणि सत्यवीर हे लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार आहेत. तर घरमन कहलॉन, गुरप्यार बागापुराना, वीरेंद्र, अमनदीप मुलतानी आणि अनमोल बिश्नोई हे अमेरिकेत लपले आहेत. याचबरोबर, लखा कुरुक्षेत्र पोर्तुगालमध्ये, मनीष भंडारी थायलंडमध्ये आणि राजा ऊर्फ माँटी इंग्लंडमध्ये आहेत. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्सचा धाकटा भाऊ आहे. 

अनेक राज्यांत पसरले आहे नेटवर्क नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काही काळात लॉरेन्स बिश्नोईची गँग फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. मात्र आता या गँगने देशभरात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. ही गँग आता पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरली आहे. अलीकडेच मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या शूटर्सपैकी दोन उत्तर प्रदेशचे आहेत.

लॉरेन्सने इतर अनेक गँगनाही दिलीय साथ लॉरेन्स बिश्नोई यांच्यासोबत आज अनेक मोठ्या आणि धोकादायक गँग आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये दिल्लीचा हाशिम बाबा गँग, हरयाणाचा कला जाठेदी, गोगी गँग, सुखविंदर ग्रुपचा समावेश आहे. राजस्थानमधील आनंदपाल गँग, यूपीतील ब्रिजेश सिंह, धनंजय सिंह, बिहारमधील अनंत सिंग आणि राजन तिवारी हेही लॉरेन्स बिश्नोईच्या गँगसोबत आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानचा खलिस्तान समर्थक दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याचा लॉरेन्स बिश्नोईशी संबंधही समोर आला आहे.

लॉरेन्स बिश्नोईचे खास साथीदारलॉरेन्स बिश्नोईचे काही खास साथीदार देश-विदेशातून ही गँग चालवत आहेत. यामध्ये रोहित गोदरा, सतविंदर सिंह उर्फ ​​गोल्डी ब्रार, काला जथेडी उर्फ ​​संदीप झांझारिया, अनमोल उर्फ ​​भानू, सचिन बिश्नोई उर्फ ​​सचिन थापन आणि कपिल सांगवान यांसारख्या काही नावांचा समावेश आहे. एकट्या पंजाब-हरयाणामध्ये गोल्डी ब्रारवर जवळपास ५४ गुन्हे दाखल आहेत. अनमोल आणि सचिन मूसवाला हत्याकांडातील आरोपी आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय