शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

... त्यामुळे 'हैदराबाद'चं नाव बदलणार, भाजपा आमदार राजासिंग यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 16:55 IST

स्वातंत्र्यपूर्व भारतात हैदराबाद संस्थान निमाजाची जहाँगिर होती. त्यावेळी भाग्य नगर शहराचे नाव बदलून हैदराबाद करण्यात आल्याचा इतिहास सांगितला

ठळक मुद्देस्वातंत्र्यपूर्व भारतात हैदराबाद संस्थान निमाजाची जहाँगिर होती. त्यावेळी भाग्य नगर शहराचे नाव बदलून हैदराबाद करण्यात आल्याचा इतिहास सांगितला फैजाबादचे नाव बदलून अयोध्या, मुगलसरायचे नाव दीन दयाल उपाध्याय, अलाहाबादचे नाव प्रयागराज ठेवण्यात आलेभाजपा आमदार राजासिंग यांची घोषणा

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत भाजपाने टी राजासिंग यांच्यारुपाने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा समोर केला आहे. योगी आदित्यनाथ यांप्रमाणेच आपल्या हिंदुत्ववादी बाण्यासाठी राजासिंग यांना ओळखले जाते. तेलंगणातील प्रचारासभेत राजासिंग यांनी आपली हीच भूमिका दाखवून दिली. आपण योगींच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्याचेच त्यांनी सूचवले आहे. कारण, तेलंगणात भाजपाचे सरकार येताच, हैदराबादचे नाव बदलणार असल्याची घोषणा राजासिंग यांनी एका सभेत केली.

स्वातंत्र्यपूर्व भारतात हैदराबाद संस्थान निमाजाची जहाँगिर होती. त्यावेळी भाग्य नगर शहराचे नाव बदलून हैदराबाद करण्यात आल्याचा इतिहास सांगितला जातो. मात्र, आता पुन्हा या शहराचे नाव भाग्यनगर ठेवण्याची भाजपाची मागणी आहे. ज्याप्रमाणे फैजाबादचे नाव बदलून अयोध्या, मुगलसरायचे नाव दीन दयाल उपाध्याय, अलाहाबादचे नाव प्रयागराज ठेवण्यात आले, त्याचप्रमाणे हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर ठेवण्यात येईल अशी घोषणा राजासिग यांनी केली. राजासिंग हे हैदराबादच्या घोशामहल विधानसभा मतदारंसघातून भाजपाचे उमेदवार आहेत. 

राजासिंग म्हणाले की, हैदराबादचे नाव यापूर्वी भाग्यनगर होते. मात्र, 16 व्या शतकात हैदराबादमधील शासक कुतुबशाह यांनी भाग्यनगरचे नाव बदलून हैदराबाद करण्यात आलं. ज्यावेळी, भाग्यनगरचे नाव हैदराबाद करण्यात आले, त्यावेळी हिंदूंवर अत्याचार झाले, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. आता, हैदराबादची जुनी ओळख आम्हाला हवी आहे. त्यामुळेच भाजपाची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव मूळ म्हणजेच भाग्यनगर ठेवले जाईल. हिंदू संस्कृतील आणि संस्कार मिटविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम भाजपाचा असल्याचे राजासिंग यांनी म्हटले. तसेच सिंकदराबाद आणि करिमनगरचेही नाव बदलण्याची गरज असल्याचे राजासिंग म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणाElectionनिवडणूक