वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून रुग्णांना मदत

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

संगमनेर : वृत्तपत्र विक्रेता संघटनेने दोन रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचे धनादेश देवून दातृत्व निभावले.

Helping the patients with Newspaper Association | वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून रुग्णांना मदत

वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून रुग्णांना मदत

गमनेर : वृत्तपत्र विक्रेता संघटनेने दोन रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचे धनादेश देवून दातृत्व निभावले.
संघटनेचे सदस्य, वृत्तपत्र विक्रेते किशोर खिरोडे यांना किडनीचा विकार तर अशोक थोरात यांना हाताला इन्फेक्शन झाले होते. परंतू दोघांची परिस्थिती हालाकीची असल्याने महागडे उपचार न परवडणारे होते. त्यांना आजारपणात आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती. ही गोष्ट लक्षात घेवून संघटनेने दातृत्व दाखवत सोमवारी आर्थिक मदतीचे धनादेश खिरोडे व थोरात यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी अध्यक्ष सतीश आहेर, उपाध्यक्ष भारत पडवळ, सचीव संजय अहिरे, शिवाजी हासे, रविंद्र नेहूलकर, किशोर घोलप, बाळासाहेब मंडलिक, दिनेश टकले, दिलीप म्हाळणकर, राजेंद्र वर्पे, संजय बेल्हेकर, हसनभाई शेख, अशोक निर्‍हाळी, अण्णा धूमाळ, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो-१५एसएएनपी०१ धनादेश ओळी- वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश किशोर खिरोडे व अशोक थोरात यांना सुपूर्द करताना अध्यक्ष सतीश आहेर, संजय अहिरे, भारत पडवळ, बाळासाहेब मंडलिक, शिवाजी हासे, रविंद्र नेहूलकर आदी.

Web Title: Helping the patients with Newspaper Association