हेल्मेटमुळे वाचला जीवपोलिसांच्या तत्परतेने मिळाले त्वरित उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 01:31 IST2015-09-03T01:31:21+5:302015-09-03T01:31:21+5:30

पुणे : सिंहगड रोडवर वडगावच्या पुलाजवळ ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी बस, मारुती व्हॅन आणि दुचाकीचालक यांच्या झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले़ त्याच वेळी दुसर्‍या दुचाकीवरून जाणारा तरुणही या अपघातात सापडला होता़ मागून वेगाने धडक बसल्यावर तो सिमेंटच्या रोडवर पडला़ सुदैवाने हेल्मेट घातले असल्याने तो बचावला़ याच वेळी तेथून जाणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी बघ्यांना दूर सारून रिक्षातून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची तत्परता दाखविल्याने त्यांनाही त्वरित उपचार मिळू शकले़

Helmet read quickly and soon | हेल्मेटमुळे वाचला जीवपोलिसांच्या तत्परतेने मिळाले त्वरित उपचार

हेल्मेटमुळे वाचला जीवपोलिसांच्या तत्परतेने मिळाले त्वरित उपचार

णे : सिंहगड रोडवर वडगावच्या पुलाजवळ ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी बस, मारुती व्हॅन आणि दुचाकीचालक यांच्या झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले़ त्याच वेळी दुसर्‍या दुचाकीवरून जाणारा तरुणही या अपघातात सापडला होता़ मागून वेगाने धडक बसल्यावर तो सिमेंटच्या रोडवर पडला़ सुदैवाने हेल्मेट घातले असल्याने तो बचावला़ याच वेळी तेथून जाणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी बघ्यांना दूर सारून रिक्षातून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची तत्परता दाखविल्याने त्यांनाही त्वरित उपचार मिळू शकले़
सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला होता़ त्यात दुचाकीचालक नामदेव खुडे आणि विजय जगदाळे हे जखमी झाले़ दुसरे दुचाकीचालक सूरज लोंढे यांनी या अपघाताबाबत सांगितले, की नांदेडकडून वडगावकडे जात असताना पाठीमागून वेगाने एक मिनी बस आली व व्हॅनवर धडकली़ या अपघातात व्हॅनखाली एक दुचाकी सापडून चालक जखमी झाला. त्याच्या पुढेच मी जात होतो़ मागून वेगाने धडक बसल्याने मीही सिमेंटच्या रस्त्यावर पडलो़ सुदैवाने डोक्यात हेल्मेट असल्याने मुका मार बसण्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही़ मात्र, त्याच वेळी खुडे जबर जखमी झाले होते़ व्हॅनचालकाच्या पायालाही जखम झाली होती़ तेथून जाणारे वाहतूक शाखेचे पोलीस नाईक दीपक झेंडे हे धावत आले व त्यांनी मदत केली़

Web Title: Helmet read quickly and soon