हॅलो पान४ साठी-पणजीचे आणखी विश्लेषण
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30
(१) जोडवृत्त दुसर्या फाईलमध्ये आहे)

हॅलो पान४ साठी-पणजीचे आणखी विश्लेषण
(१ ) जोडवृत्त दुसर्या फाईलमध्ये आहे)पणजीत संघटनात्मक कामाचा अभावकाँग्रेसच्या पराभवाची कारणमिमांसा : उमेदवारांचा संबंध तिकिटापुरताचपणजी : पणजीच्या मतदारांनी सुरेंद्र फुर्तादो यांना नगरसेवक व महापौर म्हणूनच पाहिले आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून सुरेंद्र फुर्तादो हे मुळीच मान्य झाले नाहीत. काही प्रमाणात चुकीची उमेदवार निवड व पणजीतील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा अभाव यामुळे काँग्रेसचा पणजीत दारुण पराभव झाला, अशा प्रकारची कारणमिमांसा काँग्रेसच्या अंतर्गत गोटातही केली जात आहे.सव्वीस वर्षांपूर्वी काँग्रेसने पणजीत आपला शेवटचा उमेदवार निवडला. १९९४ सालापासून काँग्रेसचे पणजीतील संघटनात्मक काम कमी होत गेले. आता तर काँग्रेस पक्ष संघटना म्हणून राजधानी पणजीत काहीच अस्तित्वात नाही. काँग्रेसने ९४ सालापासून आतापर्यंत जे उमेदवार उभे केले, त्या उमेदवारांनी पणजीत काँग्रेससाठी कोणते योगदान दिले आहे, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. केशव प्रभू, रमेश सिलिमखान, दिनार तारकर, यतीन पारेख यांनी काँग्रेस पक्ष संघटनेचे काम हे निवडणुकांपुरते केले. निवडणुकांनंतर त्यांचा काँग्रेसशी संबंध राहिला नाही. सुरेंद्र फुर्तादो यांनीही महापौर बनल्यानंतर पणजीत काँग्रेस पक्ष संघटना बांधावी, असा प्रयत्न केला नाही. फुर्तादो हे आता पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी केवळ आठ-दहा माणसे घेऊन घरोघर फिरले. या उलट भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर हे तीस-चाळीस कार्यकर्त्यांना घेऊन फिरत होते. प्रत्येक प्रभागांत वेगवेगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असायचे. महिला, युवा व पणजीतील प्रतिष्ठित नागरिक त्यांच्यासोबत असायचे.-------------सारस्वत किंवा भंडारीच मान्य (चौकट)पणजी मतदारसंघाची रचना आणि सामाजिक स्थितीच अशी आहे की, येथे सारस्वत समाजातील किंवा भंडारी समाजातील उमेदवार चालतो. तोच उमेदवार मतदार मान्य करतात. १९८९ नंतर एकही ख्रिस्ती धर्मिय उमेदवार निवडून आला नाही. फुर्तादो हे महापौर असले तरी, एकही नगरसेवक त्यांच्यासोबत प्रचारात नव्हता. पणजीतील एखादी प्रसिद्ध अशी महिला किंवा सारस्वत समाजातील किंवा ख्रिस्ती धर्मियांमधील प्रतिष्ठित असे डॉक्टर, अभियंते किंवा तत्सम व्यक्ती त्यांच्यासोबत प्रचारावेळी नव्हत्याच. त्यामुळे काँग्रेसला पणजीबाहेरील नेते व कार्यकर्ते वापरावे लागले. भाजपचा प्रचार याबाबत वरचढ ठरला. पणजीतील उच्चभ्रू समाजातील आणि बहुजन समाजातील लोकांनीही सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यासोबत भाजपचा प्रचार केला. (खास प्रतिनिधी)