हॅलो पान १ : कोमुनिदाद जागेतील घरे कायदेशीर
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:04+5:302015-03-25T21:10:04+5:30
करण्याची प्रक्रिया लवकरच

हॅलो पान १ : कोमुनिदाद जागेतील घरे कायदेशीर
क ण्याची प्रक्रिया लवकरचपणजी : २००० सालापूर्वी कोमुनिदाद जमिनीत बांधण्यात आलेल्या घरांना कायदेशीर करण्यासाठी लवकरच कोमुनिदाद दुरुस्ती विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री आणि उपमुख्ममंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी विधानसभेत दिली. आमदार माविन गुदिन्हो यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेच्यावेळी डिसोझा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोमुनिदाद आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर त्या अहवालातील शिफारशींनुसार सरकार कार्यवाही करणार आहे. शिफारशींना अनुसरून कोमुनिदाद दुरुस्ती विधेयक आणले जाईल आणि नंतर कोमुनिदाद जमिनीवरील घरे ही कायदेशीर करणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून कोमुनिदादच्या जमिनीवर घरे बांधून असलेल्या लोकांना ती पाडण्यासाठी नोटिसा येत असल्याचे गुदिन्हो यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले; परंतु अशा घरांना कोमुनिदाद प्रशासकाकडून नोटिसा जाणे म्हणजे ती पाडणे, असा त्याचा अर्थ होत नाही. तशी घरे पाडली जाणार नसल्याचे डिसोझा यांनी सांगितले.