शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! १४ तासांचे अंतर फक्त सात तासात कापून वाचवले चिमुकल्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 08:42 IST

एका महिन्याभराच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.

बंगळुरु - एका महिन्याभराच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या बाळाचा जीव वाचविण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल ५१६ किमीचे अंतर अवघ्या सात तासांत पार केलं.  केरळ पोलिस आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाने ही अशक्यप्राय गोष्ट केली आहे.  

फातिमा लाबिया या 31 दिवसांच्या बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिच्या श्वसननलिकेवर व हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी फातिमाला कन्नूर जिल्हा रुग्णालयातून तिरुवनंतपुरम येथील श्री चित्र मिशन रूग्णालयात हलवायचे होते. सुरवातीला फातिमाला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने तिरुवनंतपुरमला नेण्यात येणार होते. पण कन्नूरपासून जवळील मंगळूरू विमानतळ चार तासांच्या अंतरावर होते. तसेच एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करेपर्यंत पाच तास लागणार होते.त्यामुळे श्री चित्र मिशन रुग्णालयातील व कन्नूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी फातिमाला रस्तेमार्गे तिरुवनंतपुरमला नेण्याचे ठरविले. त्यासाठी थिमीम या अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाची निवड करण्यात आली होती. कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानचे तब्बल 14 तासांचे अंतर 7 तासांत पार केले. सदर बाळावर तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याचे प्राण वाचले आहेत. केरळ पोलीस व अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालक तिमीमच्या या कामगिरीचे दशभरातून कौतुक होत आहेत.केरळ पोलिसांनी अ‍ॅम्ब्युलन्ससाठी ग्रीन कॉरिडोअरची सोय करत कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानच्या सर्व वाहतूक पोलिसांना अ‍ॅम्ब्युलन्स येण्याआधीच सर्व मार्ग मोकळे करून ठेवण्याचे आदेश दिले होते. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोन डॉक्टर, फातिमाचे आई वडील प्रवास करत होते तर सोबत पोलिसांच्या दोन एसयूव्ही गाड्या पुढे मागे धावत होत्या. कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानच्या तीन जिल्ह्यात पोलिसांच्या गाड्या बदलल्या मात्र अ‍ॅम्ब्युलन्स चालक थिमीमने मात्र सलग गाडी चालवली. थिमिमने कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानचे 516 किमी अंतर ज्याला साधारणत: 14 तास लागतात ते अवघ्या 6 तास 45 मिनीटात पार केले.

टॅग्स :KeralaकेरळPoliceपोलिस