फेसबुकचे हॅलो
By Admin | Updated: April 25, 2015 01:36 IST2015-04-25T01:36:04+5:302015-04-25T01:36:04+5:30
आपल्याला एखादा फोन येतो ‘अननोन नंबर‘, किंवा कॉल मिस होतो, कळायलाच मार्ग नाही की, नेमका फोन कोणाचा होता? किंवा कधीकधी आपल्या फोनमधे सेव्ह नसलेल्या

फेसबुकचे हॅलो
आपल्याला एखादा फोन येतो ‘अननोन नंबर‘, किंवा कॉल मिस होतो, कळायलाच मार्ग नाही की, नेमका फोन कोणाचा होता? किंवा कधीकधी आपल्या फोनमधे सेव्ह नसलेल्या नंबरवरुन फोन येतो, आपण विचारत राहतो; कोण बोलतंय ? यापुढे या ‘सिच्युएशन’च आपल्या आयुष्यातून बाद होतील अशी चिन्हं आहेत! कारण फेसबूक मेसेंजरने डेव्हलप केलेलं एक नवंकोरं अॅप, त्याचं नाव आहे ‘हॅलो!’ हे अॅप फेसबूकशी कनेक्ट असेल आणि ज्याचं फेसबुकवर प्रोफाईल असेल, ज्यानं ज्यानं आपला नंबर फेसबुकवर नोंदवलाय, त्यानं कुणालाही फोन केला की त्याचे फेसबुक प्रोफाईल पिक्चर नंबरसह तत्काल झळकेल!