हॅलो 4 : स्कोडा इंडियातर्पे ‘अँनिव्हर्सरी एडिशन’

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30

पणजी : स्कोडा ऑटो इंडियाने भारतभरात 6.99 लाख रुपये इतक्या प्राथमिक किंमतीला रॅपिड अँनिव्हर्सरी एडिशन दाखल केली आहे. स्कोडाच्या सिंपली क्लेव्हर या ब्रँड मूल्याचा पुरेपूर अनुभव देणारी ही रेंज अनके नव्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे.

Hello 4: Skoda Indiaartpe 'Anniversary Edition' | हॅलो 4 : स्कोडा इंडियातर्पे ‘अँनिव्हर्सरी एडिशन’

हॅलो 4 : स्कोडा इंडियातर्पे ‘अँनिव्हर्सरी एडिशन’

जी : स्कोडा ऑटो इंडियाने भारतभरात 6.99 लाख रुपये इतक्या प्राथमिक किंमतीला रॅपिड अँनिव्हर्सरी एडिशन दाखल केली आहे. स्कोडाच्या सिंपली क्लेव्हर या ब्रँड मूल्याचा पुरेपूर अनुभव देणारी ही रेंज अनके नव्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे.
रॅपिड अँनिव्हर्सरी एडिशनमध्ये साईड डोअर फॉईल्स, काँट्रास्टींग टोन रूफ फॉईल्स आणि वूड रेकोर इंडिरीयर ट्रीम्स असे अनेक दृश्य बदल पाहायला मिळमार आहेत. एलेगन्स प्लस मॉडेलमध्ये ग्राहकांना वाहनाशी कनेक्टेड ठेवण्याकरिता आणि वाहनाचा ठावठिकाणा 24 बाय 7 माहिती करुन देण्याकरिता ट्रॅकप्रो कार ट्रॅकींग डिव्हाईस सिस्टीमचा अंतर्भाव केली आहे. या व्हर्जनमधील स्टँडर्ड फिटमेण्ट म्हणून ड्युएल फ्रण्ट एअरबॅग्सचा समावेश केल्याने जास्तीत जास्त सुरक्षेची हमी मिळणार आहे.
अँनिव्हर्सरी एडिशनमध्ये उत्कृष्ट ड्रायव्हींग अनुभव देण्याकरिता टीपट्रॉनिक मॅन्युअल गिअर चेंजिंगने युक्त 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन, रिअर सेंटर कन्सोलमध्ये अँडजस्टेबल ड्युएल रिअर एसी व्हेण्ट्स, स्कोडा 2-डिन इंटिग्रेटेड ऑडीयो प्लेअर, फोन अँपच्या सहाय्याने फोन/ऑडीयो स्ट्रीमिंग/रिमोट कंट्रोलकरिता मिळणारी ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिीटी क्रूझ कंट्रोल, प्रोज्क्टर हेडलँम्प, उंची आणि लांबीनुसार अँडजस्ट करता येणारे स्टिअरींग व्हील असा अनेक आहेत.
स्कोडा ऑटो इंडियाच्या सेल्स, सर्व्हिस अँड मार्केर्टांग विभागेच संचालक आशुतोष दिक्षीत म्हणाले आपल्या ग्राहकांना व्यवहार्य आणि उत्कृष्ट उपाययोजना देण्याची स्कोडाची परंपरा रॅपिड अँनिव्हर्सरी एडिशनमधून पुढे सुरु राहणार आहे.

Web Title: Hello 4: Skoda Indiaartpe 'Anniversary Edition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.