हॅलो 4- आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ पुस्तकाचे प्रकाशन
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:38+5:302015-08-26T23:32:38+5:30
पणजी : डॉ. आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार र्शीराम पचिंद्रे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा कला व संस्कृती खात्याच्या ग्रंथालयात झाला. व्यासपीठावर ग्रंथपाल कुळमुळे, सारिका शिरोडकर, डॉ. नूतन बिचोलकर उपस्थित होते.

हॅलो 4- आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ पुस्तकाचे प्रकाशन
प जी : डॉ. आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार र्शीराम पचिंद्रे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा कला व संस्कृती खात्याच्या ग्रंथालयात झाला. व्यासपीठावर ग्रंथपाल कुळमुळे, सारिका शिरोडकर, डॉ. नूतन बिचोलकर उपस्थित होते.र्शीराम पचिंद्रे म्हणाले की, डॉ. आरती दिनकर यांचे ‘आरोग्यानंद’ हे पुस्तक प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात आरोग्यानंदसारखे पुस्तक आनंद तर देतातच, याशिवाय व्यायाम, आहार-विहार यांचे संतुलन कसे राखावे, हेही उत्तमरित्या यात सांगितले आहे. असे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे आणि वाचून आनंद घ्यावा.डॉ. आरती दिनकर म्हणाल्या, आजच्या बदललेल्या जीवनशैलीचे आरोग्यावर म्हणजेच शरीर आणि मनावर होणारे परिणाम जाणून घ्यायला हवेत. सध्याच्या संगणक युगाशी जुळवून घेताना आरोग्य कसे निकोप ठेवू शकतो, याविषयीचे अनुभव आणि आरोग्याविषयीचे नियम सांगून हसत-खेळत सकारात्मकतेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या पुस्तकात सांगितला आहे. त्यामुळेच वाचकाला माझे पुस्तक वाचताना आनंद मिळेल, यात शंका नाही. शिवाय स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात आहार-व्यायाम याविषयी स्त्री दुर्लक्षच करते. यासाठी आजच्या स्त्रीने आरोग्य जपावे व जीवनाचा आनंद घ्यावा. हे पुस्तक अमृता प्रकाशनने प्रकाशित केले आहे.