हॅलो ४ - हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे
By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:09+5:302015-07-07T22:56:09+5:30
मांद्रे : हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही विद्यार्थी चमकावेत यासाठी संगीत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. येथे गुरुकूल पद्धतीनुसार निवडक विद्यार्थी संगीत कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. गायन, संवादिनीचे प्रशिक्षण ज्येष्ठ शिक्षक महानंद कोठावळे व तबल्याचे प्रशिक्षण रूपेश कुबल देत आहेत. शिक्षक कोठावळे विद्यार्थ्यांना गायनाचे प्राथमिक धडे देताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून गायनातील बारकावे शिकवतात. शास्त्रीय संगीत, अभंग गायनासाठी लागणारे रसायन म्हणजे ताल, लय, सूर आणि आवाज त्यातील बारकावे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कोठावळे देतात. इयत्ता पाचवी ते सातवीच्या निवडक विद्यार्थ्यांना आठवड्यातील शुक्रवार व शनिवारी दुपारी ३ ते सायं. ५ पर्यंत विद्यालयाच्या भोम-पालये येथील शिक्षण संकुलात गायन, संवादिनी व तबल्या

हॅलो ४ - हरमल पंचक्रोशीच्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे
म ंद्रे : हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही विद्यार्थी चमकावेत यासाठी संगीत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. येथे गुरुकूल पद्धतीनुसार निवडक विद्यार्थी संगीत कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. गायन, संवादिनीचे प्रशिक्षण ज्येष्ठ शिक्षक महानंद कोठावळे व तबल्याचे प्रशिक्षण रूपेश कुबल देत आहेत. शिक्षक कोठावळे विद्यार्थ्यांना गायनाचे प्राथमिक धडे देताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून गायनातील बारकावे शिकवतात. शास्त्रीय संगीत, अभंग गायनासाठी लागणारे रसायन म्हणजे ताल, लय, सूर आणि आवाज त्यातील बारकावे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कोठावळे देतात. इयत्ता पाचवी ते सातवीच्या निवडक विद्यार्थ्यांना आठवड्यातील शुक्रवार व शनिवारी दुपारी ३ ते सायं. ५ पर्यंत विद्यालयाच्या भोम-पालये येथील शिक्षण संकुलात गायन, संवादिनी व तबल्याचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत या विद्यालयाने शिक्षणाबरोबरच संगीत व क्रीडा क्षेत्रातही भरीव प्रगती केली आहे. (प्रतिनिधी) फोटो : हरमल पंचक्रोशी विद्यालयात मार्गदर्शन करताना संगीत शिक्षक महानंद कोठावळे. (लक्ष्मण ओटवणेकर) ०७०७-एमएपी-११