हॅलो 4- गुरूंशी लीन होऊन विद्या आत्मसात करा
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30
सुदेश नार्वेकर : पर्रा येथे गुरुपौर्णिमा उत्सव

हॅलो 4- गुरूंशी लीन होऊन विद्या आत्मसात करा
स देश नार्वेकर : पर्रा येथे गुरुपौर्णिमा उत्सवपणजी : गुरूंशी लीन झालात तर कोणतीही विद्या सहज आत्मसात करता येते, असे उद्गार वाहतूक खात्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी काढले. ते पर्रा येथे ओमकार सांस्कृतिक कला मंडळाच्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होते. यावेळी बाल भवनचे कार्यक्रम अधिकारी शशिकांत पुनाजी, संगीत शिक्षक महाबळेश्वर च्यारी आणि उदेश पार्सेकर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात सुरुवातीला दीप प्रज्वलित करून गुरुपूजन करण्यात आले. कला मंडळाच्या विद्यार्थ्यांनी एकनाथ बोरकर, मच्छिंद्र मांद्रेकर आणि नेहा काणकोणकर यांचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य सादर केले. र्शावणी चिपळूणकर, सर्मथ वाळके, रितेश बोरकर, रिया शेटगावकर, प्रणाली पेडणेकर यांनी गायन केले. मेघराज कामत, जागृत सिरसाट, न्हानू पिरणकर यांनी तबला वादन सादर केले.संगीत कार्यक्रमात हार्मोनियमची साथ एकनाथ बोरकर, वेदांत मांद्रेकर, सुयश लिंगुडकर तर तबला साथ मच्छिंद्र मांद्रेकर, न्हानू पिरणकर यांनी केली. नेहा काणकोणकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन मच्छिंद्रनाथ गाड, विश्वनाथ गावस तसेच आभार शिला बोरकर यांनी व्यक्त केले.फोटो ओळी-गायन सादर करताना रिया शेटगावकर, र्शावणी चिपळूणकर, रितेश बोरकर, सर्मथ वाळके.