हॅलो-४ कमी दाबाच्या वीजपुरवठ्यापासून वडपान-डिचोलीतील ग्राहकांना दिलासा
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:39+5:302015-02-11T00:33:39+5:30
हॅलो चार मस्ट

हॅलो-४ कमी दाबाच्या वीजपुरवठ्यापासून वडपान-डिचोलीतील ग्राहकांना दिलासा
ह लो चार मस्टडिचोली : वडपान-डिचोली येथे असलेल्या जवळपास १०० वीज ग्राहकांना कमी दाबाच्या वीज वितरणाचा त्रास होत होता. या वाड्यातील काही ज्येष्ठ नागरिकांनी यासंबंधित वीजमंत्री मिलिंद नाईक यांना वैयक्तिकरीत्या लक्ष घालून या त्रासातून मुक्ती करण्याबाबत विनंती केली होती. त्या विनंतीला अनुसरून, वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी संबंधित वीज अधिकार्यांना लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.या वाड्याला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर वाड्यापेक्षा खूप जास्त अंतरावर असल्यामुळे विजेचा दाब वाड्यावर पोहोचेपर्यंत कमी होत होता. वीज खात्याने या वाड्यावर नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजित केले. अर्थात, त्यासाठी १ कि.मी. लांबीच्या नव्या ११ केव्ही वीजवाहिनीचे जाळे उभारण्याची गरज होती. त्याचबरोबर एक नवा ट्रान्सफॉर्मर आणि दीड की.मी. लांबीचा घरगुती वीजपुरवठा, तसेच पथदीप उभारण्यासाठी वीजवाहिनीचे जाळे वेगळ्याने उभे करावे लागणार आहे. या कामासाठी ११ मीटरचे २५ खांब, ९ मीटरचे १० खांब आणि ७.५० मीटरचे ३० खांब नव्याने उभे करावे लागणार आहेत. हे काम सुरू करण्याचे सर्व सोपस्कार आता पूर्ण झालेले आहेत व सुमारे पंचवीस लाख रुपये मूल्याचे काम सुरू करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेले आहेत. एकदा का हे काम पूर्ण झाले की, वडपान वाड्यावरील लोकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे.