हॅलो-४ भरतनाट्यम नृत्याविष्कारात गोव्य्

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30

भरतनाट्यम नृत्याविष्कारात गोव्याच्या नृत्यांगनांचा सहभाग

Hello-4 Bharatnatyam Dance in Drama | हॅलो-४ भरतनाट्यम नृत्याविष्कारात गोव्य्

हॅलो-४ भरतनाट्यम नृत्याविष्कारात गोव्य्

तनाट्यम नृत्याविष्कारात गोव्याच्या नृत्यांगनांचा सहभाग
गिनीज बुकमध्ये नोंद : म्हापशातील पाच नृत्यागनांचा समावेश
बार्देस : कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील शाहू स्टेडियमवर २१०० नृत्यांगनांनी सादर केलेला भरतनाट्यम कार्यक्रम विश्वविक्रमी ठरला. या नृत्याविष्काराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. भरतनाट्यममधील या पहिल्या विश्वविक्रमी नृत्याविष्कारात म्हापसा येथील विश्वजा नाईक (जी.एस. आमोणकर विद्यामंदिर), मुद्रा सावंत (सारस्वत विद्यालय), तन्वी कोरगावकर (सेंट मेरी विद्यालय), रक्षंदा आमोणकर (सारस्वत उच्च माध्यमिक) व तन्वी कोठावळे (झेवियर्स उच्च माध्यमिक) या नृत्यागनांचा सहभाग होता.
नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला बारा मिनिटांचा हा विश्वविक्रमी नृत्याविष्कार पाहण्यासाठी कोल्हापूर परिसरातील हजारो रसिक उपस्थित होते. म्हापशातील प्रियांका डान्स अकादमीच्या विश्वजा, मुद्रा, तन्वी व रक्षंदा यांनी अरंगेत्रम पूर्ण केले आहे. सध्या शिक्षण घेत असलेल्या तन्वी कोठावळे या नृत्यांगनेनी या कार्यक्रमात आपली कला उत्कृष्टपणे सादर केली. त्याबद्दल अकादमीच्या प्रियांका राणे यांनी त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
फोटो : भरतनाट्यममधील विश्वविक्रमी नृत्याविष्कारात सहभागी झालेल्या डावीकडून मुद्रा सावंत, तन्वी कोरगावकर, रक्षंदा आमोणकर, विश्वजा नाईक व तन्वी कोठावळे या नृत्यांगना. (१००२-एमएपी-०३)

Web Title: Hello-4 Bharatnatyam Dance in Drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.