हॅलो 4 -‘अँनिमी?’ चित्रपटाच्या सीडीचे प्रकाशन
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30
पणजी : ‘अँनिमी?’ हा चित्रपट जागतिक समस्या प्रेक्षकांसमोर आणतो. नवीन कोकणी चित्रपटांची निर्मिती होऊन कोकणी चित्रपट क्षेत्रात क्रांती होत आहे, हे पाहिल्यावर खूप आनंद होतो, असे मत कलाकार आणि या चित्रपटाचे तंत्रज्ज्ञ ज्ॉरी आल्मेदा यांनी व्यक्त केले.

हॅलो 4 -‘अँनिमी?’ चित्रपटाच्या सीडीचे प्रकाशन
प जी : ‘अँनिमी?’ हा चित्रपट जागतिक समस्या प्रेक्षकांसमोर आणतो. नवीन कोकणी चित्रपटांची निर्मिती होऊन कोकणी चित्रपट क्षेत्रात क्रांती होत आहे, हे पाहिल्यावर खूप आनंद होतो, असे मत कलाकार आणि या चित्रपटाचे तंत्रज्ज्ञ ज्ॉरी आल्मेदा यांनी व्यक्त केले. येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या प्रसाद क्रिएशन्स यांची निर्मिती असलेल्या ‘अँनिमी?’ या चित्रपटाच्या ऑडियो सीडीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर फादर जॉँकी लॉयला परेरा, चित्रपटाचे निर्माते ए. दुर्गा प्रसाद, दिग्दर्शक दिनेश भोसले, संगीत दिग्दर्शक शुबर्ट कॉस्टा, अभिनेत्री मिनाक्षी मार्टिन्स, सलील नाईक, समीक्षा देसाई, गायिका मॅक्सी कॉस्टा, जिजस गोम्स, मायरन मास्कारेन्हस आणि रॉकी लाझारस उपस्थित होते. ज्ॉरी आल्मेदा म्हणाले की, सत्तेच्या आशेने मनुष्यधर्माचा आणि नैतिक मूल्यांचासुध्दा आम्हाला विसर पडला आहे आणि हाच विषय हा चित्रपट आपल्या समोर मांडतो, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही भाषेचे रक्षण करण्यासाठी चित्रपट कलाकृती व संगीताचा भाग असतो. आपली मातृभाषा सुरक्षित ठेवली पाहिजे, असे मिनाक्षी मार्टिन्स म्हणाल्या.आम्ही हिंदीबरोबरच कोंकणी चित्रपट बघायला पाहिजेत, जेणेकरून चित्रपटात केलेली गुंतवणूक भरून येते, असे ए. दुर्गाप्रसाद यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन प्रियांका प्रभू चोडणकर यांनी केले. आभार दिनेश भोसले यांनी मानले. (प्रतिनिधी)